rinkurajguru

कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानंतर ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे भारतातही ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली. पण सध्या ब्रिटनमध्ये अनेक चित्रपटांची शुटींग सुरू आहेत. अचानक लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय कलाकार लंडनमध्ये अडकले आहेत. यात सैराटमधील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरूही अडकल्याची माहिती समोर आली होती. मात्र, रिंकूच्या कुटुंबीयांनी याबाबत खुलासा केला आहे.

“ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आल्यामुळे माझी मुलगी (अभिनेत्री रिंकू राजगुरू) लंडनमध्ये अडकल्याचं वृत्त माध्यमातून दिलं जात आहे. हे खरं आहे की, रिंकू तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी लंडनला गेलेली होती. मात्र, महिनाभरापूर्वीच ती घरी परतली आहे. सध्या रिंकू पुण्यात आहे,” अशी माहिती रिंकूचे वडील महादेव राजगुरू यांनी दिली. रिंकूच्या सचिवांनीही याबद्दल माहिती दिली आहे. रिंकू शुटिंगसाठी लंडनला गेली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसातच ती परत आली. रिंकूने तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट करूनही ही माहिती दिली. आपण लंडनवरून परतल्याचं आणि तब्येतही चांगली असल्याचं रिंकू पोस्टमध्ये म्हटलं होतं,” अशी माहिती त्यांनी दिली.

सैराट सिनेमातून पडद्यावर पदार्पण करणारी रिंकू सध्या घराघरात पोहोचली आहे. रिंकू सध्या तिच्या आगामी ‘छुमंतर’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर जोशी करत असून, या चित्रपटात रिंकूसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळेदेखील आहेत. या चित्रपटाचं लंडनमध्येही शुटिंग करण्यात आलं आहे.