sharmaji namkeen first look

एक्सेल एंटरटेनमेंटने(Excel Entertainment) सोशल मीडियावर पोस्टद्वारे ‘शर्माजी नमकीन’च्या फर्स्ट लुकचे अनावरण करण्यात आले आहे. अभिनेता ऋषी कपूर यांचा हा अखेरचा चित्रपट (Last Movie Of Rishi Kapoor)आहे.

  एक्सेल एंटरटेनमेंटने(Excel Entertainment) सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे ‘शर्माजी नमकीन’च्या फर्स्ट लुकचे अनावरण करण्यात आले आहे. अभिनेता ऋषी कपूर यांचा हा अखेरचा चित्रपट (Last Movie Of Rishi Kapoor)आहे. आज ऋषी कपूर यांच्या जन्मदिनी या फर्स्ट लुकचे अनावरण(First Look Of Sharmaji Namkeen) होत आहे.

  एक्सेल एंटरटेनमेंटने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्हाला एक अतिशय खास चित्रपट ‘शर्माजी नमकीन’च्या पोस्टरचे अनावरण करताना आनंद होत आहे. ज्यामध्ये हिंदी चित्रपट उद्योगातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांमधील एक ऋषी कपूर आहेत. ज्यांचे शानदार चित्रपट आणि अद्वितीय काम आपल्या सर्वांसाठीच एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्याविषयीचे प्रेम, सन्मान आणि आठवणींच्या रूपात त्यांच्या लाखो चाहत्यांसाठी भेट म्हणून त्यांच्या अंतिम चित्रपटाच्या ‘फर्स्ट लुक’चे अनावरण करत आहोत. परेश रावल यांचे खूप खूप आभार. त्यांनी ऋषीजी यांच्याद्वारे साकारण्यात येणाऱ्या व्यक्तिरेखेला चित्रित करण्यासाठी संवेदनशील पाऊले उचलत या चित्रपटाला पूर्ण केले. एक्सेल एंटरटेनमेंट आणि मॅकगफिन पिक्चर्सद्वारे निर्मित, नवोदित हितेश भाटियाद्वारे दिग्दर्शित, हा चित्रपट एका प्रेमळ ६० वर्षीय व्यक्तीची कथा आहे.”

  एक्सेल एंटरटेनमेंटची ही पोस्ट अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Excel Entertainment (@excelmovies)

  एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे प्रस्तुत आणि मॅकगफिन पिक्चर्स प्रोडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डेब्यू दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी केले आहे. चित्रपट रितेश सिधवानी, फरहान अख्तर, हनी त्रेहान, अभिषेक चौबे यांच्याद्वारे निर्मित असून कासिम जगमगिया यांची सह-निर्मिती आहे.