‘गुडबॉय’ ऋषी सक्सेनाच्या प्रेक्षक पडलेत प्रेमात, त्याच्या ‘त्या’ व्हिडिओवर येतायत भरभरून कमेंट!

वेब सिरीजची निर्मिती कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांनी केली आहे. या वेबसिरीजमध्ये ऋषी सक्सेना, खुशबू तावडे, विनय येडेकर, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी,अभ्यंग कुवळेकर आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.

  काहे दिया परदेस फेम अभिनेता ऋषी सक्सेना नुकताच गुडबॉय या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेब सिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘हंगामा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या वेब सिरिजबद्दल अतिशय धमाल,  फुल ऑन एंटरटेनिंग अशा शब्दांत प्रेक्षकांनी गुडबॉयचं कौतुक केले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official)

  वेब सिरीजची निर्मिती कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांनी केली आहे. या वेबसिरीजमध्ये ऋषी सक्सेना, खुशबू तावडे, विनय येडेकर, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी,अभ्यंग कुवळेकर आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. बद्रिश पाटील यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official)

   काय आहे स्टोरी

  कॉलेजपासून सतत मुलींच्या मागे असलेल्या तरुणाला खऱ्या प्रेमाचा शोध आहे. मात्र त्याच्याविषयी मुलींमध्ये त्याच्याबद्दल एक वेगळाच समज निर्माण होतो आणि तो अडचणीत येतो. हा समज नेमका काय आहे? आणि यातून त्याच्या अडचणी कशा वाढत जातात आणि या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तो काय करतो, त्यातून तो यशस्वी होतो का, त्याला खरं प्रेम मिळतं का अशा प्रश्नांची उत्तरं वेब सिरीज पाहिल्यावरच मिळतील. गुडबॉय ही वेबसिरीज ‘हंगामा’च्या हंगामा प्ले’ या व्हिडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official)