‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ मालिकेला ‘राईजिंग स्टार’ पुरस्कार

अमेझॉनची निर्मिती असणाऱ्या ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’च्या दुसऱ्या सीझनमधील कलाकार कीर्ती कुल्हारी, मानवी गगरू, सयानी गुप्ता आणि गुरबानी जुडगे यांनी बेस्ट रायजिंग स्टार श्रेणीत स्वतःचं स्थान निर्माण केलं.

जगापुढं उत्तम निर्मितीचा आदर्श ठेवत अमेझॉन प्राईम व्हिडिओनं बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये बक्षीस पटकावलं. एशियन कंटेंट अवॉर्ड २०२० मध्ये या मालिकेवर कौतुकाचा वर्षाव झाला. अमेझॉनची निर्मिती असणाऱ्या ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’च्या दुसऱ्या सीझनमधील कलाकार कीर्ती कुल्हारी, मानवी गगरू, सयानी गुप्ता आणि गुरबानी जुडगे यांनी बेस्ट रायजिंग स्टार श्रेणीत स्वतःचं स्थान निर्माण केलं.


अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या भारत प्रभारी अपर्णा पुरोहित म्हणाल्या, “ही बातमी ऐकून मला आनंदही झाला आणि अभिमानही वाटला. एशियन कंटेंट अवॉर्डसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पुरस्कारांमध्ये भारतीयांना गौरवीत केलं जाणं, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या पुरस्कारामुळं आमच्या मालिकेवर जागतिक पसंतीची जणू मोहोरच उमटली आहे. आमच्या प्रतिभेची घेतली गेलेली ही दखल आनंददायक आहे. यापुढेही सर्वोत्कृष्ट, विश्वासार्ह आणि प्रामाणिक गोष्टी घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येतच राहू. आम्ही तयार करत असलेल्या कलाकृती या जागतिक दर्जाच्या असल्याचंच या पुरस्कारामुळं सिद्ध झालंय.”

प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्सद्वारा या मालिकेची निर्मिती करण्यात आलीय. ही एकमेव भारतीय मालिका आहे जिनं चीन, कोरिया, सिंगापूर, तैवान, इंडोनेशिया, जपान आणि थायलंडसह आशियातील अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकं पटकावली आहेत.