दोघांच्या रोमान्समध्ये तिसऱ्याची एन्ट्री, मग काय रितेशचा झालेला चेहरा बघून तुम्हीही पोट धरून हसाल!

जेनेलियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत दोघेही रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहेत.

  अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघे ही सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. यावेळी जेनेलियाने त्या दोघांचा एक रोमॅन्टिक कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

  जेनेलियाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत दोघेही रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहेत. मात्र, यावेळी त्या दोघांचा रोमान्स सुरु असताना तिसरा कोणी येतो. या दोघांच्यामध्ये तिसरा, दुसरा- तिसरा कोणी नसून हा त्यांचा पाळिव कुत्रा आहे. त्यांचा हा कुत्रा त्यांच्यामध्ये येऊन दोघांच्या गालावर चाटू लागतो. त्यांचा कुत्रामध्ये आल्यानंतर जेनेलियाला हसू येतं. तर, दुसरीकडे रितेशचे हावभाव हे बघण्यासारखे आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

   

  हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. हे दोघे नेहमीच त्यांचे असे खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करतात.