ritesh deshmukh and genelia in bigg boss ott

रिेतेश-जेनेलिया(Riteish And genelia) ही जोडी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरी मुक्कामासाठी नव्हे, तर विजेत्‍याची (Declaration Of Winner Of Bigg Boss Ott ) घोषणा करण्यासाठी घरामध्‍ये प्रवेश करणार आहे.

    सर्वात वादग्रस्‍त शो ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss Ott)फिनालेकडे वाटचाल करत आहे. एकीकडं घरातील प्रत्‍येक जण फिनालेदरम्‍यान ग्‍लॅमरस व मोहक दिसण्‍यासाठी तयारी करत आहे, तर दुसरीकडं रितेश व जेनेलिया देशमुख(Riteish Deshmukh And Genelia In Bigg Boss Ott) यांच्‍या चाहत्‍यांना मोठं सरप्राईज मिळणार आहे. हे दोघेही शनिवारी १८ सप्‍टेंबरला घरामध्‍ये प्रवेश करणार आहेत. करण जोहरसोबत मंचावर गप्‍पागोष्‍टी करणार आहेत. रिेतेश-जेनेलिया ही जोडी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरी मुक्कामासाठी नव्हे, तर विजेत्‍याची (Declaration Of Winner Of Bigg Boss Ott ) घोषणा करण्यासाठी घरामध्‍ये प्रवेश करणार आहे.

    विजेत्‍यांना किंवा विजेत्‍याला सलमान खानच्‍या ‘बिग बॉस’ घरामध्‍ये प्रवेश करण्‍याची संधी मिळेल. याबाबत जेनेलिया म्‍हणाली की, मी माझ्या आवडत्‍या दोन व्‍यक्‍तींसाठी मंच शेअर करण्‍यास खूपच उत्‍सुक आहे. रितेश आणि मला फिनालेचा भाग होण्‍याचा खूप आनंद होत आहे. इतरांपेक्षा मी ‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता कोण असणार आहे हे जाणून खूपच उत्‍सुक आहे, कारण प्रत्‍येक स्‍पर्धक उत्तमरित्‍या खेळत आहे. कोण जिंकेल, हे सांगणं खूपच अवघड असल्याचं जेनेलियाचं म्हणणं आहे. रितेश म्‍हणाला की, मी फायनलिस्‍ट्सना, तसेच होस्‍ट म्‍हणून उत्तम कामगिरी बजावत असलेला माझा प्रि‍य मित्र करण जोहरला भेटण्‍यास खूपच उत्‍सुक आहे. मी कोणतेही ‘संडे का वॉर’ एपिसोड्स चुकवलेले नाहीत. मी एपि‍सोड्स व लाइव्‍ह फीडच्‍या माध्‍यमातून या ओव्‍हर-दि-टॉप स्‍पर्धकांचा प्रवास पाहत आलो आहे.