प्रिती झिंटाच्या हातावर किस करणं रितेश देशमुखला पडलं महागात, घरीच गेल्यावर जेनेलिया वहिनींनी केली अशी अवस्था!

नुकतेच जेनेलिया डिसुझाने एक मजेशीर व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का घरी गेल्यावर काय होते?

  बॉलिवूडमधलं सगळ्यात क्यूट कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. ते नेहमी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडिओला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसादही मिळतो. व्हिडीओत त्यांचं क्यूट बॉन्डिंग नेहमीच बघायला मिळतं. मात्र नुकताच त्यांचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

  या व्हिडीओत पहायला मिळतंय की, एका अवॉर्ड फंक्शनमध्ये रितेश देशमुख अभिनेत्री प्रिती झिंटाला भेटल्यावर तिच्या हाताचा किस घेतो. हे सगळे एका बाजूला उभी राहून जेनेलिया पाहताना दिसते आहे. खरेतर हा जुना व्हिडीओ आहे, हा व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाला होता. मात्र आता या व्हिडीओनंतर काय घडले, हे जेनेलियाने या व्हिडीओत दाखवले आहे. जेनेलियाने घरी आल्यावर रितेशला क्या किया क्या किया म्हणत मारण्याची एक्शन केली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

  नुकतेच जेनेलिया डिसुझाने एक मजेशीर व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का घरी गेल्यावर काय होते?

  जेनेलिया देशमुखच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओवर चाहतेच नाही तर सेलिब्रेटीही कमेंट्स करत आहेत.