जेनेलियाला वाढदिवसानिमित्त दिल्या रितेशने अशा शुभेच्छा

अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हिचा आज वाढदिवस. जेनेलियाचा हा ३३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त रितेश देशमुख ने जेनेलिया डिसूजा ला शुभेच्छा देताना इंस्टाग्राम वर त्यांचा फोटो शेअर केला.

अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हिचा आज वाढदिवस. जेनेलियाचा हा ३३ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त रितेश देशमुख ने जेनेलिया डिसूजा ला शुभेच्छा देताना ट्विटरवर वर त्यांचा फोटो शेअर केला. तुझे मेरी कसम या चित्रपटामधून जेनेलिया हिने बॉलिवूड मध्ये एंट्री केली होती. रितेश देशमुख सोबत लग्न करून देशमुख घराण्यात तिने प्रत्येकाची मन जिंकली. आपल्या विविध व्हिडिओ, फोटोंच्या माध्यमातून ते दोघे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. 

ट्विटरवर वाढदिवसानिमित्त पोस्ट केलेल्या या पोस्टमध्ये रितेशने जेनेलियाला मिठी मारतानाचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. या पोस्टखाली “तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, माझे हास्य, माझी क्राईम पार्टनर आहेस. माझी मार्गदर्शक, माझा उत्साह, माझा प्रकाश, माझे जीवन, माझे सर्वकाही तूच आहेस. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासोबत मोठे होणे हे एक आशीर्वादासारखे आहे”, असे लिहिले आहे.