rhea-chakraborty

रियाचा जामीन अर्ज कोर्टाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन वेळा फेटाळला होता. अखेर रियाला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. परंतु शौविक चक्रवर्तीला कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही आहे. एनसीबीने रिया चक्रवर्तीची १५ तास चौकशी केली होती. यानंतर रियाला अटकर करण्यात आली होती.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant singh Rajout) मृत्यू प्रकरणातील तपासात ड्रग्ज (drugs) संबंधित दोषी आढळल्याने एनसीबीने (NCB) रिया चक्रवर्तीला (Riya Chakraborty) ८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी अटक करण्यात आली होती. रियाला कोर्टातही हजर करण्यात आले होते. रियाचा जामीन अर्ज कोर्टाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन वेळा फेटाळला होता. अखेर रियाला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. परंतु शौविक (Shauvik ) चक्रवर्तीला कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही आहे. एनसीबीने रिया चक्रवर्तीची १५ तास चौकशी केली होती. यानंतर रियाला अटकर करण्यात आली होती.

एनसीबीचे काय आहेत आरोप?

रिया चक्रवर्ती गेल्या २८ दिवसांपासून कोठडीत आहेत. रिया चक्रवर्ती यांचे वकील सतीश मनेशिंदे यांचे म्हणणे आहे की, त्यांना अटक करण्याचा कट रचला जात आहे, तर एनसीबी म्हणते की, रिया आणि शौविक चक्रवर्ती बॉलीवूडमधील ड्रग सिंडिकेटचा भाग आहेत. एकीकडे रियाचे वकील म्हणतात की रियाने सुशांतसाठी औषधे खरेदी केली, जे अत्यंत कमी प्रमाणात होते, त्यामुळे त्याला जामीन मिळायला हवा. दुसरीकडे, रिया चक्रवर्ती यांना ड्रग्स असल्याचे सिद्ध करण्यासाठी एनसीबीने अद्याप कोर्टात कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तथापि, एनसीबीचे तर्क हे होते की रिया किंवा शौविकला सोडण्यात आले असल्याने, या प्रकरणात अद्याप चौकशी सुरू असल्याने ते पुरावे नाकारण्याचा प्रयत्न करू शकतात.

रियाशिवाय एनसीबीने बर्‍याच जणांना केली आहे अटक

ड्रग चॅट प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्ती यांच्यासह अनेक आरोपी ड्रग पेडलर्सना अटक केली, ज्यात तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा स्टाफ सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत या तिघांचा समावेश आहे. याशिवाय एनसीबीने या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत यांचीही चौकशी केली.