रिया, शौविकला दिलासा नाहीच..आणखी इतके दिवस तुरुंगात राहावे लागणार

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant singh rajput) प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Riya And Shauvik ) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात ड्रग्ज अँगल (Drugs Case) समोर आल्यानंतर तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत (Jail) २० ऑक्टोबरपर्यंत (October) वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant singh rajput) प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Riya And Shauvik ) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात ड्रग्ज अँगल (Drugs Case) समोर आल्यानंतर तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत (Jail) २० ऑक्टोबरपर्यंत (October) वाढ करण्यात आली आहे.

रिया आणि शौविक यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने दोघांचाही जामीन अर्ज फेटाळला. ८ सप्टेंबर रोजी रियाला अटक (Arrest) केल्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती. या आधीही न्यायालयाने दोन वेळा रियाचा जामीन अर्ज फेटाळला होता.

तत्पूर्वी, रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. जर या प्रकरणी रिया दोषी आढळल्यास तिला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.