अभिनेता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया जबाब नोंदवणार

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया जबाब नोंदवणार आहे. कारण रिया

मुंबई –  अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया जबाब नोंदवणार आहे. कारण रिया ही सुशांतच्या संपर्कात होती. त्याचप्रमाणे त्याच्या डिप्रेशनबद्दल आणि हत्येप्रकरणी रियाची चौकशी केली जाणार आहे. काल बुधवारी बॉलिवूडमधील कास्टींग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

तेव्हा त्यांनी सांगितले की, सुशांत माझा चांगला मित्र होता. आम्ही दोघेही ऐकमेकांच्या संपर्कात होतो. २७ मे रोजी सुशांतने मला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. सुशांतने फोन केला तेव्हा तो नॉर्मल वाटत होता असं मुकेशने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांची चौकशी केली आहे. त्याचप्रमाणे आज रिया चक्रवर्ती हीची चौकशी पोलिस करत आहेत. परंतु सुशांतने असे टोकाचे पाऊल का उचलले ? अशा प्रकारची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.