‘ताई मिळालेल्या संधीचा फायदा उठवलात’ अमृता फडणवीसांच्या ‘महिला दिना’च्या गाण्यावर रोहित पवारांच ट्विट!

गाण्याच्या सुरुवातीलाच एक कुटुंब दाखवलं गेलं आहे. या कुटुंबातील लहान मुलगी सुरेख पद्तीने हर्मोनियम वाजवताना दिसत आहे. आई वडिलांचा पाठींबा मात्र, आजोबांच्या धाकामुळे लोककलेत सहभागी होऊ शकत नसलेल्या एका मुलीची कथा या गाण्यात दाखवण्यात आली आहे.

  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनेकवेळा त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगते. अनेकदा त्यांना ट्रोलर्सचाही सामना करावा लागतो. महिला दिनाचे औचित्य साधत त्यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सध्या चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांना मिळालेल्या संधीचा योग्य फायदा उठवला, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

   

  काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा! असं ट्विट रोहित पवार यांनी केलय.

  गाण्याच्या सुरुवातीलाच एक कुटुंब दाखवलं गेलं आहे. या कुटुंबातील लहान मुलगी सुरेख पद्तीने हर्मोनियम वाजवताना दिसत आहे. आई वडिलांचा पाठींबा मात्र, आजोबांच्या धाकामुळे लोककलेत सहभागी होऊ शकत नसलेल्या एका मुलीची कथा या गाण्यात दाखवण्यात आली आहे.

  ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी!’, असे म्हणत अमृता फडणवीसांनी आपल्या नव्या गाण्याची माहिती दिली आहे.

  ट्रोलर्सना इशारा

  आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या.