बिंग बींची कार पोलिसांच्या ताब्यात, सलमान खान चालवत होता गाडी!

सलमान खान यांच्या वडिलांनी बच्चन यांच्याकडून ही कार खरेदी केल्याची माहिती अतिरिक्त परिवहन आयुक्त एल एल नरेंद्र होळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

    शेहनशाह अमिताभ बच्चन यांची लक्झरी कारवर पोलिसांनी कारवाई केलीये. कर्नाटक पोलिसांच्या परिवहन विभागाने ही कारवाई केलीये. बंगळूरू पोलिसांच्या परिवहन विभागाने एक रोल्स- रॉयल गाडी जप्त केली. ही कार अमिताभ बच्चन यांच्या नावावर आहे. ही गाडी सलमान खान नावाचा ड्रायव्हर चालवत असल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

    अमिताभ बच्चन यांची गाडी चालवणारी ही व्यक्ती सलमान खान जी वसंतनगरची रहिवासी आहे. सलमान खान यांच्या वडिलांनी बच्चन यांच्याकडून ही कार खरेदी केल्याची माहिती अतिरिक्त परिवहन आयुक्त एल एल नरेंद्र होळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. २००७ साली निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी ही कार बिग बींना भेट म्हणून दिली होती.

    तर २०१९ साली उमरा डेव्हलपर्सच्या युसूफ शरीफ उर्फ ​​डी बाबू यांना बिग बींनी ही कार विकली. मात्र या कारची मालकी आजही अमिताभ बच्चन यांच्याच नावावर आहे. या गाडीबरोबरच बाबू यांच्या अनेक कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. वाहनाची कागदपत्र सादरकेल्यानंतरच या कार बाबू यांना परत देण्यात येतील असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.