रोनित-रिचाचा ‘कॅन्डी’ ट्रेलर प्रदर्शित!

'कँडी'मध्ये प्रेक्षकांना रूद्रकुंडमधील पापं उघडकीस आणण्यासाठी रोमांचकारी प्रवासावर नेलं जाईल. वूट ओरिजिनल्स 'कँडी' ही एक मोठी आणि रोमांचकारी मालिका आहे.

    विविधांगी भूमिकांच्या बळावर रिचा चढ्ढानं आपला वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. रोनित रॅायनंही खलनायकी भूमिका यशस्वीपणे साकारत आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकीत केलं आहे. हे दोन्ही कलाकार ‘कॅन्डी’ या आगामी वेब सिरीजमध्ये एकत्र झळकणार आहेत. ८ सप्टेंबर रोजी प्रीमियर असलेल्या या मालिकेचं कथानक राजकारण, महत्त्वाकांक्षा, खून, रहस्य आणि इतर अनेक गोष्टींभोवती फिरतं.

    ‘कँडी’मध्ये प्रेक्षकांना रूद्रकुंडमधील पापं उघडकीस आणण्यासाठी रोमांचकारी प्रवासावर नेलं जाईल. वूट ओरिजिनल्स ‘कँडी’ ही एक मोठी आणि रोमांचकारी मालिका आहे. याचा ट्रेलर उत्कंठावर्धक, कुतूहल निर्माण करणारा, खिळवून ठेवणारा, लक्ष वेधणारा आणि असंख्य ट्विस्ट्सनी भरलेला आहे. आशिष आर. शुक्ला यांचं दिग्दर्शन असलेली ‘कँडी’ ही मालिका रोनित आणि रिचा या दोन शक्तिशाली कलाकारांमुळं सध्या चर्चेत आहे. याबाबत रिचा म्हणाली की, मला माझ्या व्यक्तिरेखा आणि भूमिकांमध्ये प्रयोग करायला नेहमीच आवडतात. ‘कॅन्डी’मध्ये मी एका पोलिसाची भूमिका साकारली आहे. रूद्रकुंडच्या डीएसपी रत्नाची व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं.