भयंकर… या अभिनेत्रीची अशी झालीये अवस्था, Video बघून अंगावर येईल काटा!

एका चेटकीणीची ही गोष्ट आहे. जिची लग्न सोहळ्यावर नजर आहे. नवरदेव झोपला की ती नववधूला आपल्याबरोबर घेऊन जाते. राजकुमार राव आणि वरुण शर्मा हा जादूटोणा दूर करण्याची जबाबदारी स्विकारतात.

  अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पण जान्हवीचा हा व्हिडिओ बघून आनंद होण्याऐवजी लोकांना भीती वाटत आहे. जान्हवीचा ‘रूही’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधी जान्हवीने या सिनेमाचा ‘भूत लूक’ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रूही चित्रपटात जान्हवी कपूर चेटकीणीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

  ‘भूतिया वेडिंग ऑफ द इअर,’ असे लिहित तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये जान्हवीशिवाय राजकुमार राव आणि वरूण शर्मा दिसतात. व्हिडीओच्या सुरुवातीला राजकुमार दिसतो, मग वरूण शर्मा आणि यानंतर जान्हवी. नववधूच्या वेशात आरशासमोर तयार होत असलेली ही जान्हवी पाहून तुम्हाला भिती वाटू शकते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

   अशी आहे रूही

  एका चेटकीणीची ही गोष्ट आहे. जिची लग्न सोहळ्यावर नजर आहे. नवरदेव झोपला की ती नववधूला आपल्याबरोबर घेऊन जाते. राजकुमार राव आणि वरुण शर्मा हा जादूटोणा दूर करण्याची जबाबदारी स्विकारतात. यासाठी दोघही जान्हवीला पळवून नेतात आणि तिच्या आतून चेटकीण बाहेर कढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. या सगळ्यामध्ये प्रेक्षकांना कॉमेडी देखील पाहायला मिळणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)