एनटीआरकडून चाहत्यांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, ‘RRR’मधील लूक प्रदर्शित!

आज सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस. त्यानिमित्ताने आरआरआर या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. राजमौली यांनी ट्विटर अकाऊंटवर ज्युनिअर एनटीआरचा लूक शेअर केलाय.

  दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आगामी ‘आरआरआर’ चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार झळकणार आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. आज या चित्रपटातील ज्युनिअर एनटीआरचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

  आज सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस. त्यानिमित्ताने आरआरआर या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. राजमौली यांनी ट्विटर अकाऊंटवर ज्युनिअर एनटीआरचा लूक शेअर केलाय. हा लूक सध्या चर्चेत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

  काय आहे भूमिका

  ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआर हा कोमराम भीम ही भूमिका साकारणार आहे. या पूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरवरुन चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याचे दिसत होते. तसेच चित्रपटाची कथा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील अलुरी सिथारामराजु व कोमराम भीम या स्वातंत्र्यवीरांवर आधारित आहे.

  हे कलाकार झळकणार

  ज्युनिअर एनटीआर सोबत राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, ओलिविया मॉरिस हे कलाकारही स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट ८ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.