अक्षय कुमार, रणवीर सिंग की विकी कौशल? कोण असेल बॉलिवूडचा कर्ण? बॉलिवूडकरांना पडला प्रश्न

रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि विकी कौशल या तिघांच्या नावाची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू आहे. आता कर्णाच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करुन कर्णाच्या आयुष्यातील काही खास बाबी उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. डॉ.कुमार विश्वास हे यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत.

    महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. बहुतांश प्रेक्षकांना कृष्ण आणि अर्जून यांना मोठी पसंती मिळताना दिसते. या दोघांवर आजवर अनेक पुस्तक लिहिली गेली आणि चित्रपट आले. आता कर्णावर बॉलिवूडमध्ये चित्रपट येत आहे. मात्र आता कर्ण कोण साकारणार असा प्रश्न बॉलिवूडकरांना पडला आहे.

    यांची नावं चर्चेत?

    रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि विकी कौशल या तिघांच्या नावाची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू आहे. आता कर्णाच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती करुन कर्णाच्या आयुष्यातील काही खास बाबी उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. डॉ.कुमार विश्वास हे यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. पूजा एंटरटेनमेंटच्या वतीनं कर्णावर आधारित एक चित्रपट तयार करण्यात येणार आहे. ज्याचे नाव सुर्यपुत्र महावीर कर्ण असे आहे. त्याची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आरएस विमल करणार आहे.

    निर्मात्यांच्या वतीनं सोशल मीडियावर त्याचा लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे. तर जॅकी भगनानी, वासु भगनानी आणि दीपशिखा देशमुख हे निर्माते आहेत. हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित करणार आहे. तसेच हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.