rubina dileik

अभिनेत्री रुबीना दिलैक(actress rubina dilaik) अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. सध्या ती बिग बॉस १४ मध्येही सहभागी झाली आहे. सध्या तिची एक मुलाखत चर्चेत आली आहे.

अभिनेत्री रुबीना दिलैक(actress rubina dilaik) अनेक गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. सध्या ती बिग बॉस १४ मध्येही सहभागी झाली आहे. सध्या तिची एक मुलाखत चर्चेत आली आहे.(rubina dileik interview) या मुलाखतीमध्ये तिने तिच्या करिअरचा संघर्ष सांगितला आहे. तिने या मुलाखतीत सांगितलेले अनुभव थरारक आहेत.

सिद्धार्थ कन्ननने युट्यूब चॅनेलवर रुबीनाच्या इंटरव्हुयचा व्हिडीओ शेअर केला होता. रुबीनाने ६ वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी एका  दिग्दर्शक, निर्मात्याने तिला दिलेली वागणूक अत्यंत चुकीची असल्याचे रुबीनाने सांगितले आहे.

रुबीना सांगते की, “ मी साधारण ६ वर्षांपुर्वी बॉलिवूड पदार्पणाचा प्रयत्न केला होता. मात्र, मला तेव्हा अनेक वाईट अनुभव आले. कोणीही मला मदत केली नाही.. बॉलिवूडमध्ये छोट्या पडद्यावरील कलाकारांना तुच्छ समजले जाते.तिथे तुम्हाला तुमच्या करिअरची पार्श्वभूमी,क्रेडेंशिअल, अप्रोच, गाडी यासारख्या गोष्टींवरुन पारखलं जातं. पण कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टचा भाग होण्यासाठी तुमच्या स्क्रीन टेस्टला जास्त महत्त्व आहे. हे सगळं पाहून मी गोंधळून गेले. मी नकारात्मक विचार करायला लागले.”

रुबीना सांगते की, “मी त्या दिग्दर्शक, निर्मात्याचं नाव नाही घेणार पण आलेला अनुभव सांगते. ‘तू तो चित्रपट पाहिला आहेस?’, असा प्रश्न त्या दिग्दर्शकाने मला विचारला. त्यावर ‘नाही, मी तो चित्रपट कधीच पाहिला नाही. मी त्यावेळी शाळेत होते आणि एका रुढी-परंपरा धरुन चालणाऱ्या कुटुंबातून मी आहे आम्ही कधीच चित्रपट पाहण्यासाठी घराबाहेर जात नव्हतो’, असं उत्तर मी त्यांना दिलं. त्यावर, ‘खरंच तुला माहितच नाहीये मी काय काय केलं आहे ते?’, मला असं वाटतंय तुझ्या तोंडावर फार्ट (वायू उत्सर्जित) करावं’,मग ते जोरजोरात हसू लागले आणि मी स्तब्ध झाले. मला काहीच सुचत नव्हतं. त्यांनी मला खुर्चीवर बसवलं आणि विचारलं, तुला माहित आहे मी काय केलं आहे? तुला माहिती आहे मी कोण आहे? तुला हे तरी माहित आहे का तुला संधी देणारा कोण आहे? त्यावर मी इतकच बोलले की, ‘मला फक्त इकडून बाहेर पडायचं आहे”.

रूबीना म्हणते की, मी छोट्या पडद्यावरच खूश आहे. रुबीना  ‘छोटी बहू’ आणि ‘शक्ती- अस्तित्व के एहसास की’ यासारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचली आहे.