सेटवर मिळाला मिळाला नवा भाऊ, आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचं खास रक्षाबंधन!

सेटवरचा पहिला दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे. मेकअपरुममध्ये माझी भेट घेण्यासाठी संकेत आला आणि त्याने मला तायडे अशी हाक मारली.

    काही नाती ही रक्ताच्या नात्याच्या पलिकडची असतात असं म्हण्टलं जातं. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील संजनाने म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने रक्षाबंधनाच्या निमित्ताने सेटवरच्या भावाविषयी सांगितलं. आई कुठे काय करते मालिकेच्या टीममध्ये सामील होऊन मला एक वर्ष झालंय. बरोबच एक वर्षापूर्वी माझी आणि आमचं प्रोडक्शन सांभाळणाऱ्या संकेत बरेशी माझी भेट झाली.

    सेटवरचा पहिला दिवस माझ्या अजूनही लक्षात आहे. मेकअपरुममध्ये माझी भेट घेण्यासाठी संकेत आला आणि त्याने मला तायडे अशी हाक मारली. त्या दिवसापासून तो मला तायडे अशीच हाक मारतो. माझ्या भावाचं नावही संकेत आहे आणि सेटवरही या संकेतने मला भावासारखाच जीव लावला आहे. दोघांच्या नावात जसं साम्य आहे अगदी तसंच साम्य त्यांच्या स्वभावातही आहे.

    माझ्या खोड्या काढणं, थट्टा मस्करी करण्यासोबतच तो माझी खूप काळजीही घेतो. सिल्वासाला जेव्हा आमचं शूट सुरु होतं तेव्हा तो रोज फोन करुन माझी आवर्जून चौकशी करायचा. आई कुठे काय करते मालिकेमुळे मला जशी संजना ही नवी ओळख मिळाली त्याचप्रमाणे या मालिकेने मला एक भाऊही दिलाय. हे नातं मी आयुष्यभर जपेन.