s p balasubrahmanyam passed away
प्रतिभावंत गायक एस.पी. बालसुब्रण्यम यांचं कोरोनाने निधन

दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी कोरोनावर (corona) मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (s p balasubrahmanyam) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी बालासुब्रमण्यम यांनी कोरोनावर (corona) मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून त्यांना श्रद्धांजली (Tribute) वाहिली आहे.

बालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची (covid 19) लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर (MGM HEALTH CARE) या रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली होती. याविषयी त्यांच्या मुलाने एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली म्हणून त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिली होती.

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ पोस्ट करुन त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. “गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाहीये. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला”, असं त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं होतं. एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटलं जायचं. त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे.