‘आदिपुरुष’ सिनेमाचे पोस्टर
‘आदिपुरुष’ सिनेमाचे पोस्टर

'मीरा के प्रभू...' आणि 'हर हर शिव शंकर...' ही गाणी सुपरहिट झाली आहेत. आता या जोडीला 'आदिपुरुष'चं संगीत करण्याची संधी मिळाली आहे.

    ‘बाहुबली’ सुपरहिट झाल्यापासून प्रभास आणि ‘तान्हाजी’ हिट झाल्यापासून मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत चांगलेच लाइमलाईटमध्ये आले आहेत. ओम सध्या प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ बनवत आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला होता. आता या चित्रपटाच्या संगीताशी निगडीत असलेली माहिती समोर आली आहे. साचेत आणि परंपरा टंडन यांच्याकडे ‘आदिपुरुष’च्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    साचेत-परंपरा या जोडीचे आज मिलियन्स फॉलोअर्स आहेत. आपल्या जादुई संगीताच्या बळावर या जोडीनं रसिकांची मनं जिंकली आहेत. त्यांची ‘मीरा के प्रभू…’ आणि ‘हर हर शिव शंकर…’ ही गाणी सुपरहिट झाली आहेत. आता या जोडीला ‘आदिपुरुष’चं संगीत करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ‘साहो’नंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रभासच्या चित्रपटासाठी काम करत आहे.

    ‘आदिपुरुष’ हा भारतीय सिनेसृष्टीतील सध्याच्या बिग बजेट सिनेमांपैकी एक आहे. प्रभासच्या जोडीला क्रिती सनोन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट पुढल्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.