अमिताभ बच्चन यांच्यासमोर सचिनवर लेक अर्जुनमुळे आली खजील होण्याची वेळ, वाढदिवसादिवशी सांगितला ‘तो’ खास किस्सा!

सचिनने मीडियासोबत हा काहीसा मजेदार किस्सा शेअर केला होता. तर झाले असे की, सचिन व अमिताभ एका जाहिरातीच्या शूटच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यादिवशी शूटवर सचिनची पत्नी अंजली दीड वर्षाच्या चिमुकल्या अर्जुनला घेऊन आली होती.

    सचिन तेंडुलकरने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणा-या सचिनने आपल्या २४ वर्षांच्या करिअरमध्ये नाव, पैसा, ग्लॅमर सगळे काही कमावले. सचिन त्याच्या या २४ वर्षाच्या करिअरमधले अनेक किस्से त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. सचिनला लाजीरवाण्या स्थितीचा सामना करावा लागलेला एक किस्साने त्याने अमिताभ यांच्या ७५ व्या वाढदिवासादिवशी सांगितला होता.

    सचिनने मीडियासोबत हा काहीसा मजेदार किस्सा शेअर केला होता. तर झाले असे की, सचिन व अमिताभ एका जाहिरातीच्या शूटच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यादिवशी शूटवर सचिनची पत्नी अंजली दीड वर्षाच्या चिमुकल्या अर्जुनला घेऊन आली होती. ब्रेकमध्ये अमिताभ व सचिन दोघेही अर्जुनसोबत खेळत होते. मज्जा-मस्ती सुरु होती. यावेळी अर्जुन सचिनच्या मांडीवर बसून मस्तपैकी संत्री खात होता.

    संत्री खाऊन झाल्यावर अर्जुनचे हात खराब झाले तर चिमुकल्या अर्जुनने अमिताभ बच्चन यांच्या कुर्त्याला हात पुसलेत. अर्जुन चक्क महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुर्त्याला हात पुसताना पाहून सचिन इतका ओशाळला की, त्याला काही सुचेना. पण अमिताभ मात्र शांतपणे हसत होते. अर्जुनचे हे खोडकर कृत्य पाहून त्यांना हसू आवरत नव्हते. सचिनला अर्जुनचा तो किस्सा आजही आठवतो. आज त्याला तो किस्सा आठवला की, हसू येतं. पण त्यावेळी ती स्थिती त्याच्यासाठी चांगलीच लाजिरवाणी होती.