manoj patil and sahil khan

बॉडी बिल्डर मनोज पाटील(Body Builder Manoj Patil Attempts suicide) याने काल आत्महत्येचा प्रयत्न केला. मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली. या सुसाईड नोटमध्ये त्याने साहिल खान आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर आता साहिल खानने आपली प्रतिक्रिया(Sahil Khan Reaction After Manoj Patil`s Suicide Attempt) व्यक्त केली आहे.

    ‘मिस्टर इंडिया’(Mr. India)पुरस्कार प्राप्त आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉडीबिल्डिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा बॉडी बिल्डर मनोज पाटील(Body Builder Manoj Patil Attempts suicide) याने काल आत्महत्येचा प्रयत्न केला. मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली. या सुसाईड नोटमध्ये त्याने साहिल खान आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर आता साहिल खानने आपली प्रतिक्रिया(Sahil Khan Reaction After Manoj Patil`s Suicide Attempt) व्यक्त केली आहे.

    मनोज पाटीलच्या कुटुंबाकडून ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर अभिनेता साहिल खान याने झालेल्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. लवकरच खरं काय ते पोलीस बाहेर आणतील, असं साहिल खाननं म्हटलं आहे.

    साहिल खानने सांगितलं की, या केसशी माझा काहीही संबंध नाही. मला राज फौजदार नावाच्या मुलाने सोशल मीडियावर संपर्क केला. राज म्हणाला की, मनोज पाटीलने त्याला एक्सपायर झालेले स्टेरॉईड विकून १ लाख रुपये घेतले. ज्याची पावती आणि बँक डिटेल्स त्याच्याकडे होते. मी सोशल मीडियावर पोस्ट करुन मदत करण्याचा प्रयत्न केला. याला तुम्ही त्रास देणं म्हणाल का ? खराब स्टेरॉईड घेतल्यामुळे राजची तब्येत बिघडली. त्याला ह्रदयविकार आणि पोटाच्या समस्या जाणवू लागल्या. मनोजने पैसे परत करावेत, अशी राजची ईच्छा होती. मनोज मात्र काही ते परत देत नव्हता. त्यामुळे राजने माझ्याकडे मदत मागितली.

    साहिल खान पुढे म्हणाला की, पैसे मागितल्यावर मनोजने राजला मारण्याची धमकी दिली. मनोजने सुसाईड ड्रामा करुन सगळे प्रकरण माझ्यावर शेकवण्याचा प्रयत्न केला आहे. स्टेरॉईड रॅकेट वाढत आहे. राजचा मृत्यू झाल्यावर लोकांनी त्याची साथ दिली असती. मी चुकलो असेन तर प्रशासनाने कारवाई करावी. मी खरे पुरावे सादर केले आहेत.