Almost Suphal Sampurna

झी युवावरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या भरगोस प्रतिसादामुळे  मालिकेने नुकताच ३५० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. या मालिकेतील नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली आणि या कलाकारांवर प्रेक्षक व चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. नुकतंच या मालिकेत नचिकेतची आई म्हणजेच अभिनेत्री प्रिया मराठी हिची धमाकेदार एंट्री झाली.

View this post on Instagram

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

नचिकेतच्या आईच्या एन्ट्रीमुळे मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट्स आणि टर्न्स प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. नचिकेतची आई खूपच मॉडर्न आहे. लग्न झाल्यापासून ती अनेक वर्ष ऑस्ट्रेलियामध्येच स्थायिक असल्यामुळे तिची विचारसरणी देखील मॉडर्न आहे. भारतात आल्यावर नचिकेतला भेटायला जात असताना वाटेतच अचानक तिची भेट सई सोबत होते आणि त्यांच्यात माणुसकी वरून हलका वाद होतो. पण सई त्यांना काहीही उलट न बोलता आपल्यावर मोठ्यांचा आदर करण्याचे संस्कार केले आहेत असं म्हणून निघून जाते. आता या अशा भेटीनंतर जेव्हा नचिकेतच्या आईला कळेल कि नचिकेतच याच मुलीवर प्रेम आहे तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.