sai tamhnkar

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. सोशल मीडियावर सई खूप अॅक्टिव्ह आहे. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

मात्र, नेहमी फोटोतून लक्ष वेधून घेणाऱ्या सईने यावेळी कॅप्शनमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सई ताम्हणकरने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिने ग्रीन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.यावर तिने सीग्रीन कलरची टोपीदेखील घातली आहे. या फोटोपेक्षा याला दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने फोटो शेअर करत म्हटले की घरी रंगकाम चालू होते, तशीच आले शूटला. सई ताम्हणकर हिचे फोटो आणि कॅप्शन पाहून तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. सई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमी फोटो शेअर करत असते. बऱ्याचदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

View this post on Instagram

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

सई लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे त्याच्या या नवीन जोडी विषयी सांगितले की, ‘ललित आणि सई हे दोघेही गुणी कलाकार आहेत, दोघांचे काम मी पाहिले आणि अनुभवले सुद्धा आहे, या सगळ्यात ‘करण मीरा’ हे दोघेच साकारू शकतील या बाबत मी ठाम होतो. सई आणि ललित या दोघांची पात्र जरी वेगळी असली तरी ती प्रेक्षकांना भावतील हा माझा विश्वास आहे.