ऋतिक-सैफची जोडी जमली, ‘या’ चित्रपटात झळकणार एकत्र!

आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्तही नक्की करण्यात आला आहे. पुढल्या वर्षी ३० सप्टेंबर या मुहूर्तावर हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

    ‘काबील’, ‘सुपर ३०’, ‘वॉर’ यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवर आधारीत चित्रपटांमध्ये भिन्न कॅरेक्टर्समध्ये दिसलेला ऋतिक रोशन पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सध्या ‘भूत पोलीस’ या चित्रपटामुळं लाइमलाईटमध्ये असलेला सैफ अली खानही त्याच्या जोडीला आहे. ‘विक्रम वेदा’ या दक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या या चित्रपटात ऋतिक आणि सैफ एकत्र झळकणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे.

    आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्तही नक्की करण्यात आला आहे. पुढल्या वर्षी ३० सप्टेंबर या मुहूर्तावर हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार असून, ठरलेल्या वेळेत शूटिंग संपवून निश्चित केलेल्या तारखेला हा चित्रपट रिलीज होईल असा पूर्ण विश्वास चित्रपटाच्या टीमला असल्याचं सांगितलं जात आहे.

    मूळ चित्रपटाचं दिग्दर्शन करणारी गायत्री-पुष्कर ही जोडी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. गंमत म्हणजे ऋतिक आणि दीपिका पदुकोण यांचा ‘फायटर’ हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.