saif ali khan

सैफ अली खानसोबत गप्पाआगोष्टीब, सैफ अली खान म्हफणतो, ''मी विविध छटा असलेल्याा भूमिका साकारण्यााचा आनंद घेतो आणि 'तांडव'ने मला हीच गोष्टम करण्यातची संधी दिली''

तांडव चित्रपटाच्या निमित्ताने सैफ अली खानची मुलाखत….

‘तांडव’चा ट्रेलर सादर झाल्‍यापासून प्रेक्षक शो पाहण्‍याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तू या शोच्‍या सादरीकरणाबाबत किती उत्‍सुक आहे?

मी शो सादर झाल्‍यानंतर सूक्ष्‍मदर्शी व जागरूक प्रेक्षकांच्‍या प्रतिक्रिया जाणून घेण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. मी सोशल मीडियावर नसल्‍यामुळे ट्रेलरसाठी मिळालेल्‍या प्रतिक्रियांबाबत मला फारशी रूची नाही. मी चाहत्‍यांच्‍या प्रतिक्रियांचा आदर करतो, पण मला पुनरावलोकनामध्‍ये अधिक रूची आहे. मला विश्‍वास आहे की ‘तांडव’ प्रेक्षकांना आवडेल.

तू ‘तांडव’मधील भूमिकेसाठी कशाप्रकारे तयारी केली?

माझ्या मते, विशिष्‍ट भूमिकेसाठी केल्‍या जाणा-या तयारीवर विविध प्रभाव असतात. माझी भूमिका एका राजकारणीची आहे, जो अधिक प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी बोलतो. म्‍हणूनच मला समरच्‍या भूमिकेसाठी अनेक संस्‍कृतीकृत हिंदी भाषणांची तयारी करावी लागली. मजेशीर बाब म्‍हणजे मला संस्‍कृत बोलायला आवडते. कधी-कधी शूटिंगचा खूपच त्रास होतो, तर कधी-कधी शूटिंगमधून काहीसा मोकळा वेळ मिळतो. या शोमध्‍ये मला दररोज जवळपास ४ संस्‍कृत भाषण बोलायचे होते. म्‍हणून मला अनेक अवघड वाक्‍ये शिकावी लागली.

निर्मात्‍यांनी पतौडी पॅलेसमध्‍ये ‘तांडव’चे शूटिंग करण्‍याचे ठरवले तेव्‍हा तुझी प्रतिक्रिया काय होती? पॅलेसमध्‍ये शूटिंग करताना तुला किती आरामदायी वाटत होते?

पतौडी पॅलेसमध्‍ये शोच्‍या अनेक सीक्‍वेन्‍सेसचे शूटिंग करण्‍यात आले आहे. मी जगात इतरत्रपेक्षा पॅलेसमध्‍ये अधिक वेळ व्‍यतित करतो. ते माझे घर असल्‍यामुळे मला शूटिंग करताना खूपच आरामदायी वाटले. मी एखाद्या प्रकल्‍पामध्‍ये काम करत असेन तर माझा पॅलेस शूटिंगला देण्‍याबाबत काहीच हरकत नाही. वर्षातील ३४० दिवस पॅलेसचा काहीच उपयोग होत नाही. मला पॅलेसकडे व्‍यावसायिक मालमत्ता म्‍हणून पाहायला आवडते आणि भाड्याने देण्‍याचा आनंद होतो. पण टीमने पॅलेसमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर काहीसे नर्व्हस वाटते. तेथे राहण्‍यासोबत शूटिंग करण्‍याचा आनंददायी अनुभव राहिला. डिंपलजी आमच्‍यासोबत तेथे राहिल्‍या आहेत. शोचे उर्वरित शूटिंग दिल्‍लीमधील इम्‍पेरिअल हॉटेलमध्‍ये करण्‍यात आले. मी केलेले हे सर्वात आरामदायी शूटिंग होते.

तुझ्या मते, ओटीटी क्षेत्रामध्‍ये प्रवेश करणे आणि या नुकतेच सुरू झालेल्‍या ट्रेण्‍डचा भाग असणे तुझ्या भावी करिअरसाठी खात्रीदायी व सुरक्षित आहे का?

माझ्या मते, कॅमे-यासमोर असणे हाच मोठा सन्‍मान आहे. मग ते दीर्घ स्‍वरूपातील शो असोत किंवा चित्रपट असोत, त्‍यासंदर्भात काहीच हरकत नाही. तुम्‍ही त्‍याकडे गांभीर्याने पाहिले तर ते निश्चितच फलदायी ठरेल. याचा अर्थ असा की, सर्वोत्तम दिग्‍दर्शक दिग्‍दर्शन करत असतील, प्रॉडक्‍शनमध्‍ये भरपूर पैसा टाकण्‍यात आला असेल आणि सर्जनशीलता दाखवण्‍यासाठी अथक मेहनत घेतली जात असेल तर हे स्‍वरूप देखील वेगळे नाही. कोणतेही व्‍यासपीठ इतरापेक्षा सर्वोत्तम असू शकत नाही, फक्‍त प्रयत्‍न महत्त्वाचे असतात. दोन्‍ही कॅमेरे तुमच्‍या उत्‍साहाला व्‍यापून घेतात. मी याकडे कधीच जोखीम म्‍हणून पाहिले नाही, तर या नवीन स्‍वरूपासह प्रयोग करण्‍याची संधी म्‍हणून पाहिले.

अभिनेता राजकारणी सारखी प्रबळ भूमिका साकारतो, तेव्‍हा त्‍या भूमिकेमध्‍ये विविध छटा आणि कधी-कधी नकारात्‍मक छटा असतात. राजकारणीची भूमिका साकारण्‍याबाबत तुझे मत काय आहे? तुला राजकारणीची भूमिका साकारणे जोखीम वाटते का?

मी काही नकारात्‍मक भूमिका साकारल्‍या आहेत आणि त्‍या साकारण्‍याचा आनंद घेतला आहे. सकारात्‍मक भूमिका साकारण्‍यापेक्षा मला या भूमिका अधिक रोचक व प्रयोग करण्‍यासारख्‍या वाटतात. मला आनंद होत आहे की मी असुरक्षित, नीडर, अधिकारक्षम व दयाळू समरची भूमिकाची साकारू शकलो. ही भूमिका स्‍वत:च्‍याच उत्‍साहाला वेगळ्याप्रकारे आव्‍हान करण्‍यासारखी आहे. राजकारणीची भूमिका साकारणे जोखीम आहे, असे मला वाटत नाही. ‘तांडव’ हा माहितीपट नसून काल्‍पनिक चित्रपट आहे.

‘तांडव’ हा अनोखा राजकीय ड्रामा आहे, जो प्रेक्षकांनी कधीच पाहिलेला नाही. सर्वाधिक चर्चा करण्‍यात आलेल्‍या विषयांवर आधारित असलेल्‍या थीमवर शो पाहून दीर्घकाळ झाला आहे. तुला या शोबाबत काय सांगावेसे वाटते?

भारतामध्‍ये राजकारणाबाबत सर्वाधिक चर्चा केली जाते, याबाबत काहीच शंका नाही. आपला देश जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकशाहीशी संबंधित ही काल्‍पनिक राजकीय कथा घेऊन येणे अत्‍यंत रोमांचक आहे. वास्‍तविक घटनांवर आधारित काहीतरी बनवताना ते अधिक वास्‍तववादी वाटणार नाही याची काळजी घेणे सर्वात आव्‍हानात्‍मक असते. ‘तांडव’सह आम्‍ही अत्‍यंत व्‍यावसायिक पद्धतीने या मर्यादांना दूर केले आहे आणि प्रेक्षकांसाठी हा शो अधिक प्रभावी बनवण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

चित्रपट असो वा वेब शोज -प्रकल्‍पांची निवड करताना तुझ्या मनात प्रथम काय विचार येतो? स्क्रिन टाइम महत्वाचा वाटतो की भूमिका? ‘तांडव’ला होकार देण्‍यास कोणत्‍या गोष्‍टीने प्रवृत्त केले?

मी भूमिकेच्‍या महत्त्वाला अधिक प्राधान्‍य देतो. मुख्‍य भूमिका मला आकर्षून घेते. कधी-कधी स्क्रिन टाइमला देखील महत्त्व देतो. खरेतर, मला स्क्रिन टाइम कमी असल्‍यास आनंद होतो. सामान्‍यत: मी माझ्या भूमिका निवडताना भूमिकेच्या  महत्त्‍वाकडे अधिक लक्ष देतो.

अभिनेता व दिग्‍दर्शक अली अब्‍बास जफरसोबत काम करण्‍याचा अनुभव कसा होता?

कोणतेही काम सर्वोत्तम होण्‍यासाठी रोचक असणे गरजेचे आहे. अली मोठ्या चित्रपटांसारखे काहीतरी करण्‍याचा विचार करत असल्‍याचे पाहून मला खूप आनंद झाला. मला विश्‍वास होता की, यामधून कथाकार म्‍हणून तुमचे कौशल्‍य दिसून येईल. अलीच्‍या कथाकथनामध्‍ये नेहमीच वेगळेपणा असतो, जे या शोमधून दिसून येते. म्‍हणूनच त्‍याच्‍यासोबत काम करताना खूपच चांगले वाटले. त्‍याला चांगल्‍याप्रकारे माहित आहे की, सुपरहिट चित्रपटाची कथा काहीशी वेगळी असणे गरजेचे आहे. तसेच विशिष्‍ट ठिकाणी हलक्‍या व वेगळ्या हावभावाची देखील गरज आहे. प्रत्‍येक गोष्‍टीशी बारकाईने काळजी घेण्‍यात आली, ज्‍याचा मला आनंद होत आहे. तो मला काम करावेसे वाटणा-या सर्वोत्तम दिग्‍दर्शकांपैकी एक राहिला आहे आणि त्‍याचा सिनेमॅटिक दृष्टिकोन उत्तम आहे.

मी ‘टशन’ चित्रपटापासून अलीला ओळखतो आणि आम्‍ही एकत्र क्रिकेट देखील खेळलो आहोत. असे म्हटले जाते की, दोन लोक एकत्र क्रिकेट खेळतात तेव्‍हा ते एकमेकांचे जिवलग मित्र बनतात. त्‍याच्‍यासोबत काम करताना शूटिंगदरम्‍यान ठरवल्‍याप्रमाणे कोणतीच गोष्‍ट केली जात नाही. अली हा ‘तांडव’मधील खरा नवाब आहे, मी नाही. मी फक्‍त एक अंडरपेड अभिनेता आहे.