kareena - saif

या पार्श्वभूमीवर, कृपया आमच्या नवजात बाळाचे फोटो काढू नका, अशी विनंती विरुष्कानं फोटोग्राफर्सलाकेली. आपल्या नव्या आमच्या बाळाच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा, अशी विनंती करणारे पत्र या दाम्पत्यानं पापाराझ्झींना लिहिलं. करीना आणि सैफ अली खानही आपल्या दुसऱ्या बाळाच्या बाबतीत हेच करणार आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मानंतर आता अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे सेलिब्रिटी कपल लवकरच आई-बाबा होणार आहे. करीना कपूर लवकरच आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या जन्मानंतर विरुष्कानं जे केलं आहे, ते सैफिनाही करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

सेलेब्रेटींच्या आयुष्यात काय घडतं, स्टार किड्स याबद्दल जाणून घ्यायची चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. अनेक सेलिब्रिटीज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसाठी वैयक्तिक आयुष्यातील घटना, गोष्टी शेअर करत असतात. सोशल मीडियावर या मुलांचे फोटो, व्हिडीओला विशेष पसंती मिळताना दिसते. त्यामुळे स्टार किड्सचे फोटो मिळवण्यासाठी फोटोग्राफरही प्रयत्न करत असतात.

या पार्श्वभूमीवर, कृपया आमच्या नवजात बाळाचे फोटो काढू नका, अशी विनंती विरुष्कानं फोटोग्राफर्सलाकेली. आपल्या नव्या आमच्या बाळाच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा, अशी विनंती करणारे पत्र या दाम्पत्यानं पापाराझ्झींना लिहिलं. करीना आणि सैफ अली खानही आपल्या दुसऱ्या बाळाच्या बाबतीत हेच करणार आहे.

करीना आणि सैफ यांचा पहिला मुलगा तैमूर अली खान नेहमीच चर्चेत राहिला आहे. पण आपल्या दुसऱ्या मुलाच्या बाबतीच हे कपल असं काही होऊ देणार नाही आहे. आपल्या दुसऱ्या बाळाच्या प्रायव्हसीबाबत ते कठोर पावलं उचलणार आहेत, अशी माहिती मिळते आहे.