घराणेशाहीवर सैफ अली खान म्हणतो, अनेकदा चांगल्या अभिनेत्यांना संधी मिळत नाही, आईवडीलांमुळे विशेषाधिकार असलेल्यांना मिळते

बॉलिवूडमध्ये गेले काही दिवस घराणेशाहीच्या चर्चांना उधाण आले आहे. सैफ अली खानने आता या घराणेशाहीवर आपले मत व्यक्त केले आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आईवडीलांमुळे विशेषाधिकार मिळालेले काही जण असतात

 बॉलिवूडमध्ये गेले काही दिवस घराणेशाहीच्या चर्चांना उधाण आले आहे. सैफ अली खानने आता या घराणेशाहीवर आपले मत व्यक्त केले आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आईवडीलांमुळे विशेषाधिकार मिळालेले काही जण असतात ही गोष्ट सैफ अली खानने मान्य केली आहे. सैफ अली खान नुकताच एका मुलाखतीत घराणेशाहीविषयी बोलला आहे.

सैफने असे म्हटले आहे की,  सेटवर मला खान साहब असं संबोधण्यात येतं. मी जसा आहे , जशा भूमिका मी केल्या आहेत त्याचा इतरांवर खूप प्रभाव पडतो. तसेच विशेषाधिकार हा वेगळा मुद्दा आहे. काहीजण खडतर मार्गाने पुढे येत असतात. तर काहीजण सहज सोप्या मार्गाने पुढे येतात. एनएसडी, फिल्म इन्स्टीट्यूटमधून आपल्या प्रतिभेच्या जोरावर पुढे येतात. तर काहीजण आमच्यासारखे असतात जे आईवडिलांमुळे मिळालेल्या विशेषाधिकारामुळे पुढे येत असतात. सैफने पुढे असेही सांगितले की, अनेकदा चांगल्या अभिनेत्यांना संधी मिळत नाही. विशेषाधिकार असलेल्या लोकांना ती मिळते. भारतात हे अनेकदा घडत असतं.