saif-ali-khan

लवकरच सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खान अभिनेता वरूण धवनबरोबर ‘कुली नंबर १’ या चित्रपटात दिसणार आहे. नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनने त्याचा रिमेक करण्याचा निर्णय घेतला होता. या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. आता सैफने साराच्या या चित्रपटावर प्रतिक्रीया दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सैफ साराच्या या चित्रपटाबद्दल म्हणाला, मी चित्रपटाचा ट्रेलर पाहिलेला नाही. पण साराने मला चित्रपटातील गाणी दाखवली आहेत. पण साराला स्क्रीनवर पाहताना मला नेहमीच आनंद होतो. पण कधीकधी हासायलाही येतं. कारण माझ्यासाठी ती अजूनही एख लहान मुलगी आहे. पण आता ती मोठी झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

‘कुली नंबर १’ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर १ चा रिमेक आहे.या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. कुली नंबर १ मधील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सारा आणि वरुणसोबत परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानीने केली आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.