सैफ अली खानच्या ‘भूत पोलीस’चा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर रंगली चर्चा!

काही दिवसांपूर्वी चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या सैफ अली खानचा फर्स्ट लुक रिव्हील करण्यात आला होता. आहे. हॅारर-कॅामेडी असलेल्या या चित्रपटात सैफनं विभूती नावची व्यक्तिरेखा साकारली आहे.

    मागील बऱ्याच दिवसांपासून प्रदर्शनासाठी सज्ज असलेला ‘भूत पोलीस’ हा आगामी हिंदी चित्रपट लॅाकडाऊन आणि कोरोनाच्या विळख्यात असा काही अडकला की बऱ्याचदा प्लॅनिंग करूनही अद्याप रिलीज होऊ शकलेला नाही. सिनेमागृहं उघडण्याची प्रतीक्षा करणाऱ्या या चित्रपटानंही अखेर डिजिटलची वाट धरत प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा निर्णय घेतला आहे. डिस्ने प्लस हॅाटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

    काही दिवसांपूर्वी चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या सैफ अली खानचा फर्स्ट लुक रिव्हील करण्यात आला होता. आहे. हॅारर-कॅामेडी असलेल्या या चित्रपटात सैफनं विभूती नावची व्यक्तिरेखा साकारली आहे. टिप्स इंडस्ट्रीज लि. आणि ट्वेल्थ स्ट्रीट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘भूत पोलीस’चं दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केलं आहे. रमेश तौरानी, अक्षय पुरी यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची सह-निर्मिती जया तौरानी यांनी केली आहे.

    १० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सैफसोबत अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडीस, यामी गौतम आणि जावेद जाफरी या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं शूटिंग धर्मशाला इथं करण्यात आलं आहे.

    काय आहे ट्रेलरमध्ये

    2 मिनिट 50 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सैफ आणि अर्जुनची धमाकेदार एन्ट्री बघायला मिळते. सैफ आणि अर्जुन हे एकमेकांच्या पूर्णपणे उलट दाखवले आहेत. सैफ हा सतत मजा मस्ती करणारा तर अर्जुन हा सतत पुस्तकातील गोष्टींचा अभ्यास करताना दिसत आहे. त्या दोघांसोबत या चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतमी देखील झळकणार आहे.