ram kadam -saif

सैफ अली खान याच्या तांडव या वेब सिरीजला भाजपने जोरदार विरोध केला आहे. या वेबसिरीजमध्ये हिंदूंवर टीका केलेली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम घाटकोपरच्या चिराग नगर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत ते तांडव चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. जो पर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत येथून हलणार नसल्याची भूमिका राम कदम यांनी घेतली आहे.

मुंबई : सैफ अली खान याच्या तांडव या वेब सिरीजला भाजपने जोरदार विरोध केला आहे. या वेबसिरीजमध्ये हिंदूंवर टीका केलेली आहे, असा आरोप भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम घाटकोपरच्या चिराग नगर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत ते तांडव चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. जो पर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत येथून हलणार नसल्याची भूमिका राम कदम यांनी घेतली आहे.

सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या तांडव या वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बेव सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या काही भागामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची प्रतिक्रिया येत आहे. या वेब सीरिजमधून जोपर्यंत आक्षेपार्ह भाग काढला जात नाही तोवर यावर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा भाजपा नेते राम कदम यांनी दिला आहे.

या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होत आहे याची उत्सुकता लोकांना लागलेली होती. ही वेब सीरिज आता प्रदर्शित झाली असून याला प्रेक्षकांच्या संमिश्र पसंती पहायला मिळत आहेत. यातील काही संवादावरुन राम कदम यांनी पून्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे.

का सतत चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये हिंदू देवी-देवतांचा अवमान करण्याचं काम केलं जातं. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे तांडव ही वेब सीरिज. सैफ अली खान पुन्हा एकदा अशा सीरिजचा भाग आहे ज्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफरला त्या सीरिजमधून भगवान शंकाराची मजा उडवणारा भाग काढून टाकावा लागणार आहे. अभिनेता झीशान आयुबलाही माफी मागावी लागणार आहे. जोवर आवश्यक ते बदल केले जाणार नाहीत, तोवर याचा बहिष्कार केला जाईल,” असं ट्विट राम कदम यांनी केले आहे.