dilip kumar and saira bano

दिलीप कुमार(dilip kumar) यांची तब्यत दिवसेंदिवस खालावत जात आहे. याची काळजी सायरा बानो(saira bano) यांना वाटत आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, ''त्यांच्या तब्येतीसाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा.''

दिलीप कुमार(dilip kumar) यांची तब्यत दिवसेंदिवस खालावत जात आहे. याची काळजी सायरा बानो(saira bano) यांना वाटत आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, ”त्यांच्या तब्येतीसाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा.”

अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे चोपन्न वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आता दिलीपकुमार हे अठ्याण्णव वर्षांचे आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांची काळजी घ्यावी लागते. आणि आजकाल त्यांची तब्येत व्यवस्थित राहत नसल्याची माहिता सायरा बानो यांनी दिली आहे.

दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली होती. एहसान खान आणि असलम खान यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे दिलीप कुमार यांना क्वारंटाईन करण्यात आलं होत. दिलीप कुमार यांचे वय अठ्याण्णव आहे. तर त्यांचे भाऊ एहसान खान यांचे वय नव्वद असून असलम खान यांचे वय त्यापेक्षा थोडे कमी आहे. त्यांना हृदयविकार आणि रक्तदाबाचाही त्रास होता. त्यावेळी दिलीप कुमार यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते.