सैराटमधील परश्याचं पुन्हा लागलं पोरींना याडं, Video बघून पुन्हा पडल्या आकाश ठोसरच्या प्रेमात!

आकाशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओबरोबर या अविस्मरणीय क्षणांचा अनुभव देखील त्यानं शेअर केला आहे. तो म्हणातो,

    नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलेला आकाश ठोसर आता  मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं सैराटमध्ये साकारलेलं परश्या हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. मात्र कितीही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला तरी आकाशने आपले पाय मात्र जमिनीवरच ठेवले आहेत. आजही तो गावातील मित्र-मंडळींसोबत कुस्ती खेळायला जातो. दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Akash Thosar (@akashthosar)

     

    आकाशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या व्हिडिओबरोबर या अविस्मरणीय क्षणांचा अनुभव देखील त्यानं शेअर केला आहे. तो म्हणातो,

    ” खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी…!! “लहानपणापासूनच कळत-नकळत मातीचा लळा लागला. वडलांनी माझ्या आणि त्यांच्या हौशेपोटी तालमीत पाठवलं. तालमीत ५ वर्ष काढली.’तालीम’ जोर,बैठका, डावपेच,शिस्त या पलीकडेही बरंच काही देऊन गेली.

    तालमीतलं हसतं-खेळतं वातावरण, एकाच ध्येयाने पेटून उठलेले पैलवान सवंगडी, रोज न चुकता करायचा सराव,गप्पा-गोष्टी…अशा सगळ्या आठवणी अजूनही सोबत आहेत.लाल मातीच्या स्पर्शात एक वेगळीच ताकद आणि ऊर्जा आहे.आणि त्यामुळेच मी इथपर्यंत आलो.या लाल मातीचा आणि माझ्या गुरुजनांचा,पैलवान मित्रांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. आणि त्याचाच उपयोग आज मला या कला क्षेत्रात होतोय. या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला या मातीत रुजायला,खेळायला आणि लढायला शिकवलं त्या सर्व माझ्या मातीतल्या माणसांना प्रणाम आणि धन्यवाद…

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Akash Thosar (@akashthosar)

     

    खरंतर आभार , धन्यवाद हे शद्ब कितीही केलं तरी तुम्हा सगळ्यांसाठी अपुरे आहेत…तरीही तुमचा सर्वांचा मी सदैव ऋणी राहील आणि मातीशी हे माझं नातं असच घट्ट राहील.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Akash Thosar (@akashthosar)