सैराट मधल्या ‘आर्ची’ची मैत्रीण ‘आनी’ सध्या काय करतेय?; तिचे हॉट फोटो पाहून चाहते झाले घायाळ

‘सैराट’नंतर अनुजा इतर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. त्यामुळे अनुजा सध्या काय करते, असा प्रश्न तिच्या चाहत्यांनाही पडला होता.

    नागराज मंजुळे यांचा  ‘सैराट’ (sairat) हा सिनेमा मराठी चित्रपट सृष्टीसाठी अजरामर ठरला. चित्रपटाला आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले, पण या सिनेमातील आणखी एका अशाच व्यक्तिरेखेने सर्वांचे लक्ष वेधले होते, ती म्हणजे आनी. होय, आर्चीच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी आनी. आनीची ही व्यक्तिरेखा साकारली होती ती अनुजा मुळे हिने.

    ‘सैराट’नंतर आर्ची अर्थात रिंकु राजगुरू (rinku rajguru) व परश्या म्हणजे आकाश ठोसर यांच्या करिअरची गाडी वेगाने धावू लागली. पण आनी मात्र ‘सैराट’नंतर कुठल्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. ही आनी सध्या कुठेय? काय करतेय?तर ही आनी अर्थात अनुजा मुळे (anuja mule) सध्या फिल्मी क्षेत्रात नाही तर एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करतेय.

    ‘सैराट’नंतर अनुजा इतर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. त्यामुळे अनुजा सध्या काय करते, असा प्रश्न तिच्या चाहत्यांनाही पडला होता. या प्रश्नाचे उत्तर तिने स्वत: दिले होते. ‘आस्क मी नाऊ’ या सोशल मीडियावरील सेशनद्वारे तिने तिच्या आयुष्याबद्दल सांगितले होते.

    सध्या तू काय करतेस? असा प्र्रश्न या सेशनमध्ये एका चाहत्याने तिला विचारला होता. यावर तिने वकिलाच्या कपड्यातील एक फोटो पोस्ट करत, हा प्रश्न विचारणा-या सगळ्यांसाठी उत्तर ‘वकिली’ असे उत्तर दिले होते. म्हणतेच अनुजा आता वकीली करतेय.

    वकिलीत तिने ‘मास्टर्स’ पदवी मिळवली आहे. एकंदर काय तर आर्ची, परश्या चित्रपटांत रमले आहेत. आनीने मात्र वकीलीच्या क्षेत्रात करिअर सुरू केले आहे, अर्थात भविष्यात भूमिका मिळाल्या तर त्या आपण नक्की करू, असे तिने म्हटले आहे.