Tanaji-Galgunde-Nude-Photoshoot

सैराट (Sairat) चित्रपटात आपल्या दमदार अभिनयानं सर्वांनाच चकित करणारा तानाजी सध्या आपल्या एका न्यूड फोटोशूटमुळे(Tanaji Galgunde Nude Photo shoot) चर्चेत आला आहे.

    नागराज मंजुळे यांच्या सैराट (Sairat) या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानं सिनेसृष्टीला अनेक नवे चेहरे दिले. तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde) हा देखील यांच्यापैकीच एक. चित्रपटात आपल्या दमदार अभिनयानं सर्वांनाच चकित करणारा तानाजी सध्या आपल्या एका न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. (Tanaji Galgunde Nude Photo shoot) अभिनेत्री वनिता खरात हिने न्यूड फोटोशूट करुन थक्क केलं होतं अन् आता तिच्याच पावलांवर पाऊल ठेवत तानाजीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

    तानाजीने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तानाजी गिटार घेऊन उभा आहे. चित्रपटात एका गावातल्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या तानाजीचे बोल्ड रुप पाहून अनेकांनी अक्षरश: तोंडात बोटं घातली आहे.

    “माझे पाय  योग्य रचनेत नाहीयेत, पण माझं  संगीत आहे…! मी माझ्या स्वतःच्या रचना करण्यात चांगला आहे… कारण मी मी आहे.!” अशा आशयाची कमेंट त्यानं या फोटोवर केली आहे.

    त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शरीराची सकारात्मकता या विषयावर हे खास फोटोशूट करण्यात आलं आहे. तेजस नेरूरकर याने तानाजीचे न्यूड फोटो काढले आहेत. तानाजीच्या या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तानाजीने इतरांच्या शरीराकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या फोटोतून देण्याचा प्रयत्न केला आहे.