सलमान आणि कतरिनाच्या व्हिडिओची सध्या चर्चा

सलमान खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. पण सलमान अद्यापही अविवाहीत आहे. अशातच सलमानचा एक जुना व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान कतरिनाला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे.

सलमान खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले. पण सलमान अद्यापही अविवाहीत आहे. अशातच सलमानचा एक जुना व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान कतरिनाला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर असलेला हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. लोक यावर खूप प्रतिक्रिया देत आहेत. सलमान खान कतरिनाला लग्नाची मागणी घालत आहे आणि कतरिना त्यावर हसताना दिसत आहे. कधी काळी सलमानचे नाव कतरिनासोबत जोडले गेले होते. ते दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांचे नाते नंतर तुटले. पण लोकांना नेहमीच ही जोडी आवडत होती आणि आताही आवडते , असे दिसते.