अखेर भाईजानने सांगितला पहिल्या किसिंग सीनचा अनुभव, खास चाहत्यांसाठी तो VIDEO केला शेअर!

हा व्हिडीओ दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यावेळी चित्रपटात असलेल्या किसिंग सीनवर सलमानने प्रतिक्रिया दिली आहे.

  सलमान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा ही सलमान आणि दिशा पटाणीच्या किसिंग सीनची होती. सलमान कधीच किसिंग सीन करत नाही हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. त्यात आता सलमानने हा किसिंग सीन खरा असल्याचे म्हटले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

  हा व्हिडीओ दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यावेळी चित्रपटात असलेल्या किसिंग सीनवर सलमानने प्रतिक्रिया दिली आहे. “चित्रपटात एक किसिंग सीन आहे. मी दिशासोबत हा सीन केला आहे. पण, मी दिशाला किस केलेलं नाही. तर, सेलोटेपवर किस केलं आहे,” असं सलमान त्या व्हिडीओमध्ये म्हणाला.

  सलमानने आजवर कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन दिलेला नाही. सलमानने यापूर्वी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते लाजाळू स्वभावामुळे तो इंटिमेट आणि किसिंग सीन देत नाही. पण आता ‘राधे’ चित्रपटात पहिल्यांदाच सलमानने किसिंग सीन दिल्यामुळे चर्चा रंगल्या होत्या.

  हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सलमान आणि दिशा व्यतिरिक्त जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.