salman khan in antim movie

‘अंतिम’(antim) या चित्रपटामध्ये सलमान खानचा नवा अंदाज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील त्याच्या फर्स्ट लूकचा व्हिडिओ(salman first look video) खूप व्हायरल झाला आहे.

सलमान खानने ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटानंतर आणखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात केली आहे. या चित्रीकरणादरम्यानचा व्हिडीओ अभिनेता आयुष शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)


आयुष शर्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, सलमान वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओतून सलमानने ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केल्याचे स्पष्ट होत आहे. सलमानचा फर्स्ट लूक व्हिडिओतून दाखवण्यात आला आहे.  हा व्हिडीओ शेअर करत ‘अंतिमच्या चित्रीकरणास सुरुवात’ असे कॅप्शन आयुषने दिले आहे.

‘अंतिम’ या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून पुण्यात सुरू झाले होते. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. सलमान खान २-३ दिवसांपूर्वी तिथे पोहोचला आहे.