सुपरहिट तमिळ चित्रपट मास्टरच्या रिमेकमध्ये दिसणार सलमान खान?

मास्टर चित्रपटात अभिनेता थलपती विजय यानं साकारलेली भूमिका किंवा यातील बडाई भवानी ही विजय सेतूपती यानं साकारलेली भूमिका सलमान खान यानं करावी यासाठी गेल्या महिनाभरापासून निर्माता मुराद खेतानी सलमान खानशी चर्चा करत आहेत.

  सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दबंग खान आता दक्षिणेत सुपरहिट झालेल्या मास्टरया चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. मूळ चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यानं मुख्य भूमिका साकारली होती.  हा चित्रपट प्रचंड गाजला आहे. याचे हिंदी डब वर्जनही आलं होतं. कोरोना काळातील लॉकडाउन उठल्यानंतर देशभर प्रदर्शित झालेला सुपरस्टारचा हा पहिला चित्रपट होता. बॉक्स ऑफीसवर या चित्रपटानं जबरदस्त कमाई केली.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

  या चित्रपटाचा हिंदी रिमेक कबीर सिंह या चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी आणि एंडेमॉल शाईन करत आहेत. मास्टर चित्रपटात अभिनेता थलपती विजय यानं साकारलेली भूमिका किंवा यातील बडाई भवानी ही विजय सेतूपती यानं साकारलेली भूमिका सलमान खान यानं करावी यासाठी गेल्या महिनाभरापासून निर्माता मुराद खेतानी सलमान खानशी चर्चा करत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

  सध्या सलमान खानचे चाहते त्याच्या राधे-द मोस्ट वाँटेड भाई या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ईदच्या मुहूर्तावर १३  मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रभू देवा यानं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जबरदस्त अॅक्शन-ड्रामापट असून, २०२१ मध्ये प्रदर्शित होणारा हा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपट आहे. यामध्ये सलमान खानसह जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, रणदीप हुडा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. किक २ या चित्रपटातूनही सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साजिद नाडीयादवाला निर्मित कभी ईद कभी दिवाली या चित्रपटातही सलमान खान काम करणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)