isabella kaif

बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या अफेअरची चर्चा विशेष रंगली होती. २००५  मध्ये मैंने प्यार क्‍यों किया चित्रपटातून कतरिनाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. आता कतरिनाला सुमारे १५वर्षे झाले असून ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आता कतरिनापाठोपाठ तिची धाकटी बहीण इसाबेल कैफदेखील मोठी फॅन फॉलोइंग मिळवित आहे. इसाबेलने माशा-अल्लाह या गाण्यातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. इसाबेलचे हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)

बॉलिवूडमध्ये कतरिनाला लाँच करणाऱ्या सलमान खानने देखील इसाबेलचे हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. एवढेच नव्हे तर तिच्या गाण्याचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने केलेले इसाबेलचे कौतुक बघता कतरिनाप्रमाणेच सलमान इसाबेलला देखील लाँच करेल अशी शक्‍यता नाकारता येणार नाही.

View this post on Instagram

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)

दरम्यान, नवीन अभिनेत्रींना बॉलीवूडमध्ये लाँच करण्याबद्दल सांगायचे झाल्यास नव्वदच्या दशकात भाग्यश्री, नगमा, रवीना टंडन, आयेशा जुल्का, रेवती यासारख्या नामांकित अभिनेत्रींना देखील सलमाननेच लाँच केले होते. त्यानंतर सलमाननेच लॉंच केलेल्या कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, डेझी शाह, झरीन खान या अभिनेत्री आजही बॉलीवूडवर अधिराज्य करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)