आमिरच्या अफेअरबद्दल सलमान खानने आधिच केला होता खुलासा, सोशल मीडियावर व्हायरल होताेय ‘तो’ जूना VIDEO

सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये सलमानला आमिर खानच्या अफेयर्स बद्दल विचारण्यात येतं, आणि सलमान त्याला मजेशीर उत्तर देतो.

  बॉलीवूडचे तीन खान आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान हे तीन खान सतत सिनेमांबरोबर त्यांच्या पर्सनल आयुष्याबाबतही चर्चेत असतात. हे तीनही खान एकमेकांचे कट्टर स्पर्धक मानले जातात. सलमानचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sudarshan (@notwhyral)

  काही चित्रपट वगळता या तिघांना एकत्र जास्त काम केलं नाही. आमिरने सलमान सोबत ‘अंदाज अपना अपना’  या चित्रपटात काम केलं होतं. मात्र या सेटवर ते एकमेकांसोबत बोलत देखील नव्हते असं म्हटलं जातं. याच दरम्यान सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये सलमानला आमिर खानच्या अफेयर्स बद्दल विचारण्यात येतं, आणि सलमान त्याला मजेशीर उत्तर देतो.

  [read_also content=”दीपिका पादूकोणलाही कोरोनाची लागण, सोशल मीडियावर शेअर केले हेल्पलाईन नंबर!~https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/bollywood-actress-deepika-padukone-tested-covid-positive-after-father-prakash-podukone-tested-positive-nrst-124492/”]

  सलमानला विचारण्यात आलं होतं, ‘आमिर खानच्या अफेयर्स बद्दल ज्या अफवा चालू आहेत, त्यात काही तथ्य आहे का’, यावर सलमान खान म्हणतो ‘त्या अफवा आमिरच्या बाबतीत नाहीत, तर त्या माझ्या बाबतीत आहेत. आमिरची इमेज खूपचं क्लीन आहे. माहीत नाही तो हे सगळं तो कसं काय सांभाळतो. एकतर तो खूपचं देखणा आहे. त्यात तो विवाहित आहे. तो प्रत्येक वेळी एकचं म्हणत असतो मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो. आणि यामुळेच त्याचा बचाव होतो.’