‘राधे’मधील नवं गाणं प्रदर्शित, सलमान खानच्या ‘त्या’ हूक स्टेपची पुन्हा होणार चर्चा!

सिटी मार’ची हुक स्टेप सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी पुरेशी आहे, आणि सलमान खानच्या या हुक स्टेपसोबत, ती प्रचंड वायरलदेखील होते आहे. ट्रेलर आणि गाणे पाहिल्यानंतर, या वर्षी ईदला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे.

    राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच ‘सिटी मार’ हे गाणे खूप चर्चेत असून सोशल मीडियावर हा ट्रॅक चर्चेचा विषय बनला आहे. यातच आज, सलमान खानने हा बहुप्रतीक्षित चित्रपटात सलमानच्या आइकॉनिक गाण्यांचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता, ‘सिटी मार’ पहिल्यापासूनच या वर्षीचा सर्वात मोठा चार्टबस्टर बनण्याच्या मार्गावर आहे.

    हे गाणं कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायले आहे. शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे ज्यांनी या आधी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ तयार केला होता.

    सलमान खानची सिग्नेचर डांस स्टाइलसोबत, तरुणाईची सध्याची आवडती हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पटानी आणि प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार, ‘सिटी मार’मध्ये प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणार हे नक्की. सोबतच, सलमान आणि दिशा दोघांनीही आपल्या सेंसेशनल केमिस्ट्री आणि डांस सर्व कसोट्यांना खऱ्या उतरल्या आहेत. ‘सिटी मार’ची हुक स्टेप सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी पुरेशी आहे, आणि सलमान खानच्या या हुक स्टेपसोबत, ती प्रचंड वायरलदेखील होते आहे. ट्रेलर आणि गाणे पाहिल्यानंतर, या वर्षी ईदला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे.

    सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे