१३ तारखेला सलमान खानचा राधे चित्रपटगृहातच होणार प्रदर्शित, स्वत: भाईजानने सांगितली थेएटर्सची नावं!

एसके फिल्म्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. “फिल्म राधेसाठी मध्य पूर्व देशांमधून ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे.

    प्रत्येक वर्षी ईदच्या दिवशी ‘दबंग’ अभिनेता सलमान खान त्याची फिल्म रिलीज करून त्याच्या चाहत्यांना भेट देतच असतो. यावर्षी सुद्धा ईदच्या दिवशी म्हणजेच येत्या १३ मे रोजी बहूचर्चित ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड’ ही फिल्म रिलीज होणार आहे. ही फिल्म रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांकडून कमालीची पसंती मिळतेय. या फिल्मसाठी आता परदेशात ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे.

    एसके फिल्म्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. “फिल्म राधेसाठी मध्य पूर्व देशांमधून ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. यूएई, कतार, कुवेत, सौदी अरब आणि बेहरीन या देशांमधून फिल्मसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. सलमान खानच्या फिल्मसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे! तुम्ही तुमच्या जवळच्या सिनेमागृहाच्या वॉक्स सिनेमा, नोवो सिनेमा, रील सिनेमा आणि स्टार सिनेमा सारख्या वेबसाईटवरून तुमची सीट बुक करू शकता. सुरक्षित रहा!”

    ‘दबंग’ अभिनेता सलमान खानने देखील एक ट्वीट शेअर केलंय. “मिलते हैं थिएटर में…!”, असं म्हणत त्याने हे ट्वीट शेअर केलं आहे.