बिग बॉस-१४ साठी सलमान खान सज्ज

लॉकडाऊनच्या काळात सलमान आपल्या पनवेलच्या फार्महाऊसवर होता. तेव्हा त्याने शेतीत काम करत असतानाचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला होता. आता नुकतेच सलमानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तो घरामध्ये हातात झाडू घेऊन साफ-सफाई करताना दिसत आहे. 'घर के सब काम कर लो खत्म क्योंकि अब सीन पलटेगा, अशी कॅप्शन त्याने फोटोला दिली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘बिग बॉस’ रियालटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटला येणार आहे. या शोच्या १४ व्या सीझनची जोरदार तयारी चालू आहे. वास्तविक, टीव्ही मालिकांच्या शुटिंगची घोषणा झाल्यापासून निर्मात्यांनी शोची तयारी सुरू केली आहे. बीग बॉस-१४ चा सीझन थोडा हटके आणि वेगळा असणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात सलमान आपल्या पनवेलच्या फार्महाऊसवर होता. तेव्हा त्याने शेतीत काम करत असतानाचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला होता. आता नुकतेच सलमानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तो घरामध्ये हातात झाडू घेऊन साफ-सफाई करताना दिसत आहे. ‘घर के सब काम कर लो खत्म क्योंकि अब सीन पलटेगा, अशी कॅप्शन त्याने फोटोला दिली आहे.  या कॅप्शनवरून असं वाटत आहे की, या शोची जबरदस्त तयारी चालू आहे. तसेच हा शो बघण्यासाठी भाईजानचे चाहते उत्सुक आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

Ghar ke sab kaam karlo khatam, kyunki ab scene paltega! #BiggBoss2020 #BB14 @beingsalmankhan

A post shared by Colors TV (@colorstv) on

यंदाचा सीझन लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या थीमवर असण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. बिग बॉस-१४ च्या पहिल्या प्रोमोसोबतच भाईजानचा एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यामध्ये बिग-बॉसच्या शोमध्ये काय बदल होणार आहेत. याबाबत प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. कारण या प्रोमोमध्ये सुपरस्टार सलमान खान शेतात रोपांची लागवड करताना दिसत आहे.