kavita kaushik

‘बिग बॉस’ या शोचे सध्या १४ वे पर्व सुरु आहे. या शोमध्ये आता टीव्ही विश्वातील कविता कौशिक हिने एन्ट्री केली आहे. त्यामुळे हा शो चांगलाच चर्चेत आहे.  दरम्यान अभिनेता सलमान खानने कविता कौशिकचा फॅन असल्याचा खुलासा केला आहे. (salman khan fan of kavita kaushik)

छोट्या पडद्यावरील ‘एफआयआर’ या मालिकेमुळे कविता लोकप्रिय झाली.  या मालिकेत तिने चंद्रमुखी चौटाला ही भूमिका साकारली होती. याच मालिकेतील कविताच्या भूमिकेमुळे सलमान खान तिचा चाहता झाला. सलमानने बिग बॉसच्या सेटवर ही गोष्ट मान्य केली आहे. नुकत्याच झालेल्या विकेंड वॉरमध्ये सलमानने कविताचा चाहता असल्याचे म्हटले आहे.

सलमानने केलेली स्तुती ऐकून कविताने त्याचे आभार मानले. अलिकडेच कविता कौशिकने वाइल्ड कार्डच्या माध्यमातून बिग बॉस १४मध्ये प्रवेश मिळवला.सध्या ती घराची कॅप्टन आहे.