bigg boss 15 promo

कलर्स वाहिनीने(Colors Tv) बिग बॉस १५ या शोच्या प्रोमोचा व्हिडिओ रिलीज केला आहे. या प्रोमोवरून कल्पना येते की बिग बॉसच्या नव्या सीझनची थीम जंगल आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान (Salman Khan In Big Boss 15 Promo)जंगलामध्ये मच्छर मारताना दिसत आहेत.

  बिग बॉस १५(Big Boss 15 Promo) ची लोक आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतेच कलर्स वाहिनीने(Colors Tv) बिग बॉस १५ या शोच्या प्रोमोचा व्हिडिओ रिलीज केला आहे. या प्रोमोवरून कल्पना येते की बिग बॉसच्या नव्या सीझनची थीम जंगल आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान (Salman Khan In Big Boss 15 Promo)जंगलामध्ये मच्छर मारताना दिसत आहेत. या प्रोमोवरून हे स्पष्ट होतं की यावेळी बिग बॉसमधील स्पर्धकांचा प्रवास खूप अवघड असणार आहे. सगळ्या स्पर्धकांना आधी जंगलात राहून पुढच्या टप्प्यावर पोहोचावे लागेल.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  कलर्सने बिग बॉसचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करताना असे म्हटले आहे की, “यावेळी बिग बॉस १५ चा प्रवास जंगलातून सुरु होईल. तुम्ही यासाठी किती उत्साही आहात. बघा Bigg Boss 15 Promo.”

  बिग बॉस १५ मध्ये नवा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. स्पर्धकांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या शोसाठी अभिनेत्री रेखानेही आवाज दिल्याची माहिती मिळाली आहे.