salman khan

सलमानने त्याचा दुसरा चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. हा चित्रपट मराठीमधील हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

मराठीत सुपर हिट ठरेलल्या मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या रिमेकची सलमान खानने घोषणा केली आणि हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतोय असं चाहत्यांना झालं. सलमान खानने नुकताच ‘राधेः योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. हा चित्रपट यंदा प्रदर्शित होणार होता पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. आता सलमानने चित्रपटाचे उर्वरित शूटिंग पूर्ण केले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम जोरात सुरू आहे. सलमानने त्याचा दुसरा चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. हा चित्रपट मराठीमधील हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

आयुष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत

सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. टीझरची सुरुवात ही सलमान आणि आयुषच्या फायटींग सीनने होते. दरम्यान दोघेही शर्टलेस असल्याचे पाहायला मिळते. आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग १६ नोव्हेंबरपासून सुरू झाले होते. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.