arpita khan

सलमान खान सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असेल तर त्याच्या बहिणीवर. सलमान खानची बहिण अर्पिता अभिनेत्री नसली तरी ती एखाद्या अभिनेत्री प्रमाणेच प्रसिध्द आहे. अर्पिता नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. नुकताच अर्पिताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती दुबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये प्लेट्स तोडताना दिसत आहे. अर्पिताचा हा व्हिडिओबघून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलय. तर काहींनी अर्पिताच्या या व्हिडिओवर टीकाही केलीये.

या व्हिडिओत अर्पिताबरोबर तिच्या मैत्रीणीही आहेत आणि या गोष्टीचा त्या आनंद घेताना दिसत आहेत. एका ग्रीक परंपरेनुसार अशाप्रकारे प्लेट्स तोडणं शुभ मानलं जातं. ऐनशिएंट ग्रीक कल्चरनुसार प्लेट्स तोडणं हे ट्रेडीशन आहे आणि अनेक रेस्टॉरंटमध्ये हे ट्रेडिशन फॉलो केलं जातं. असं मानतात की प्लेट्स तोडल्यामुळे नकारात्मकता दूर जाते आणि समृद्धी येते. सलमान खानची बहिण अर्पितानेसुद्धा याच प्रथेनुसार या प्लेट्स तोडल्या.

अर्पिताचा व्हायरल होणारा व्हिडिओ हा जूना आहे. ज्यावेळी ती दुबईला ट्रीपला गेली होती. ती तीच्या मैत्रीणीबरोबर या हॉटेलमध्ये बसली होती. यावेळी व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओत ती एकटीच प्लेट तोडताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत तिच्या मैत्रीणीही प्लेट तोडण्याचा आनंद घेत आहेत.

२०१४ मध्ये अर्पिताचे आय़ुषसोबत लग्न झालं. नुकतीच अर्पिताच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण झाली आहेत. अर्पिताला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या डिसेंरला आर्पिताची मुलगी एक वर्षाची होईल.