salman khan

सलमानने त्याच्या वांद्र्याच्या घराजवळच एक ड्युप्लेक्स फ्लॅट (Salman Khan Took Flat On Rent)भाड्याने घेतला आहे.हा ड्युप्लेक्स फ्लॅट (Duplex Flat Of Salman)असून तो सतरा आणि अठराव्या मजल्यावर आहे. नुकतंच याबाबतचे भाडे करारपत्र समोर आले आहे.

    अभिनेता सलमान खान (Salman Khan)वांद्रे भागात गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. मात्र सलमानने मुंबईत अनेक प्रॉपर्टीमध्ये(Property Of Salman) गुंतवणूक केली आहे. सलमानने त्याच्या वांद्र्याच्या घराजवळच एक ड्युप्लेक्स फ्लॅट (Salman Khan Took Flat On Rent)भाड्याने घेतला आहे.

    सलमानने वांद्रे पश्चिमेकडील मकबा हाईट्स या टॉवरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. हा ड्युप्लेक्स फ्लॅट असून तो सतरा आणि अठराव्या मजल्यावर आहे. नुकतंच याबाबतचे भाडे करारपत्र समोर आले आहे. हा फ्लॅट मालिक बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांचा आहे.

    या फ्लॅटचा कार्पेट एरिया हा २ हजार २६५ स्के.फूट इतका आहे. सलमानने ११ महिन्यांसाठी हा फ्लॅट भाड्याने घेतला आहे. या फ्लॅटचे दर महिन्याचे भाडे ८.२५ लाख रुपये इतके आहे. सलमानने भाड्याने घेतलेला हा फ्लॅट त्याच्या कंपनीच्या कामासाठी घेतल्याचे बोललं जात आहे.

    दरमयान सलमान खानने नुकतंच त्याचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.  येत्या २६ नोव्हेंबर २०२१ ला जगभरातील चित्रपटगृहात ‘अंतिम’ प्रदर्शित होणार आहे.